अयोध्या दौरा तूर्तास स्थगित ! राज ठाकरेंचं ट्विट

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५ जून रोजीचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. आज सकाळपासून अयोध्या दौरा रद्द होणार असल्याची जोरदार चर्चा होती. अखेर राज ठाकरे यांनी स्वत: ट्विट करत तूर्तास अयोध्या दौरा स्थगित करत असल्याचे स्पष्ट केले.

मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांच्या पायाला झालेल्या दुखापतीचा त्रास गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे. त्यामुळेच दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे हे पुणे दौरा अर्धवट दौरा सोडून मुंबईत आले. डॉक्टरांकडून त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, ही शस्त्रक्रिया कधी करायची याबाबत निर्णय राज ठाकरे घेत आहेत.

दरम्यान राज ठाकरे यांनी अयोध्य दौऱ्याची घोषणा करताच मनसेकडून या दौऱ्याची जोरदार तयारी सुरु करण्यात आली होती.मात्र उत्तर प्रदेशमधून राज यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध करण्यात आला होता. तरीदेखील राज ठाकरे आपल्या अयोध्या दौऱ्यावर ठाम होते. परंतु, आता मात्र, राज ठाकरेंनी अयोध्या दौरा स्थगित केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी ट्वीट करून अयोध्या दौरा स्थगित केल्याची घोषणा केली. मात्र, त्याचवेळी या मुद्यावर सविस्तरपणे बोलण्यासाठी पुण्यातील सभेत येण्याचे आवाहन राज यांनी मनसे कार्यकर्त्यांना केले आहे.

Share