अजित पवारांनी मागितली माफी.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पिंपरीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी ‘चांद्रयान-३’च्या यशस्वी लँडिंगबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रोच्या वैज्ञानिकांचं कौतुक केले. तसेच त्यांनी त्या दिवशी झालेल्या चुकीबद्दल खुलासा केला. या मोहिमेमुळे भारत जगातल्या मोठ्या देशांच्या रांगेत जावून बसल्याचे त्यांनी सांगितले.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होत आहे. चांगली कामे सुरु आहेत. चांद्रयान ३ मोहिमेमुळे
जगाच्या पाठीवर आपले कौतुक होत आहे. मी त्या दिवशी चांद्रयान ३ बद्दल बोलत असताना चुकून माझा शब्द
चंद्रकांत गेला. त्यानंतर माझ्या मित्रांनी खिल्ली उडवली.. यावेळी अजित पवारांनी हाहाहा… असं करत हसून
दाखवले.

तसेच त्यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागितली.

Share