नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार चालू मे महिन्यात उद्यापासून तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. मे महिन्यात महाराष्ट्रात नऊ दिवस बँकांना सुटी असल्याने बँका बंद राहणार आहेत.
दरवर्षी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) भारतीय बँकांची बँक हॉलिडे लिस्ट जारी करते. याद्वारे ग्राहकांना बँका कोणत्या दिवशी बंद राहतील आणि कोणते दिवस उघडतील याचे अपडेट्स अगोदर मिळतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक सुट्टीची यादी तीन श्रेणींमध्ये विभागली आहे. यामध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्ट, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट हॉलिडे आणि बँक्स क्लोजिंग ऑफ अकाउंट्स यांचा समावेश आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून देशातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. संपूर्ण मे महिन्यात प्रत्येक राज्यात किती सुट्ट्या आहेत हे या यादीत जाहीर केलेले आहे. प्रत्येक राज्यातील सणांनुसार बँका बंद राहणार आहेत.
आरबीआयच्या कॅलेंडरनुसार, मे महिन्यापासून सलग चार दिवस बँकेला सुट्टी असेल. या सुट्ट्या राज्य आणि तिथल्या सणांनुसार बदलू शकतात. आरबीआयने चार आधारांवर बँक सुट्ट्यांची यादी जारी केली आहे. ही यादी देशभरात आणि राज्यांमध्ये साजऱ्या होणाऱ्या सणांवर आधारित आहे.
मे २०२२ मधील बँकेच्या सुट्ट्यांची यादी
- १ मे २०२२ : कामगार दिन/महाराष्ट्र दिन
- २ मे २०२२ : महर्षि परशुराम जयंती–अनेक राज्यांमध्ये सुट्टी
- ३ मे २०२२ : ईद-उल-फित्र (रमजान ईद), महात्मा बसवेश्वर जयंती (कर्नाटक)
- ४ मे २०२२ : ईद-उल-फित्र (तेलंगणा)
- ८ मे २०२२ : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
- ९ मे २०२२ : गुरु रवींद्रनाथ जयंती – पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा
- १४ मे २०२२ : दुसऱ्या शनिवारी बँकांना सुटी
- १५ मे २०२२ : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
- १६ मे २०२२ : बुद्ध पौर्णिमा
- २२ मे २०२२ : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
- २४ मे २०२२ : काझी नजरुल इस्माल यांचा जन्मदिवस – सिक्कीम
- २८ मे २०२२ : चौथ्या शनिवारी बँकांना सुटी
- २९ मे २०२२ : रविवार (साप्ताहिक सुट्टी)