भारतरत्न लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली

मुंबईः गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. गेल्या २७ दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लतादिदींची प्रकृती पुन्हा बिघडली असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

लता मंगेशकर यांना ९ जानेवारीला कोरोनाची लागण झाल्याने आणि न्यूमोनियाही ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ३० जानेवारीला लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्या होत्या. लतादिदींची प्रकृती पुन्हा बिघडली असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गानकोकीळा म्हणून ओळखलं जाते. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हिंदी संगीतविश्वात त्यांना ‘लता दीदी’ म्हणून ओळखले जाते. लता मंगेशकर यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, २० हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले आहे. २००१ साली लता मंगेशकर यांना ‘भारत रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना १९९८ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला.

 

 

Share