मोठी कारवाई, संजय राऊतांची मालमत्ता ED कडून जप्त

नवी दिल्ली : शिवसेना नेते संजय राऊत यांची अलिबाग येथील जमीन आणि मुंबईतील घर ईडीने जप्त केलं आहे. ईडीने काही दिवसांपूर्वी संजय राऊतांच्या कुटुंबीयांची चौकशी केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नानंतर ईडीकडून त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली होती. आता ईडीने थेट कारवाई केली आहे. अलिबागमधील जमीन आणि मुंबईतील एक फ्लॅट जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.  ईडीने १ हजार ४८ कोटींच्या प्रविण राऊत पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने कारवाई केली असून अलिबागजवळील किहीमधील ८ भूखंड जप्त करण्यात आले आहेत. प्रविण राऊत हे संजय राऊतांचे स्नेही आहेत. तसेच मुंबईतील एक फ्लॅट देखील जप्त करण्यात आला आहे. आता संजय राऊत देखील ईडीच्या फेऱ्यात अडकले आहेत.

Share