मिताली-अमित यांना पुत्ररत्न, राज ठाकरे झाले आजोबा

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि सुन मिताली ठाकरे यांना पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. आज दुपारी राज ठाकरे यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. त्यामुळे शिवतिर्थावर सध्या आनंदाचं वातावरण आहे. दरम्यान, मिताली ठाकरे आणि बाळ सुखरूप असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

अमित आणि मिताली यांचा साखरपुडा ११ डिसेंबर २०१७ रोजी झाला होता, तर जवळपास वर्षभराने म्हणजे २७ जानेवारी २०१९ रोजी ते विवाहबंधनात अडकले होते.  अमित ठाकरे हे सध्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र नव निर्माण विद्यार्थी सेनेची जबाबदारीही देण्यात आली आहे. जबाबदारीचा भाग म्हणून अमित ठाकरे यांनी सध्या नाशिकमधील संघटन बांधणीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्याशिवाय ठाणे आणि कल्याण डोंबिवलीतही त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या शिवाजी पार्कवरील मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यातही अमित ठाकरे स्टेजवर दिसले होते. त्यामुळे पक्षासोबतच कुटुंबाचीही मोठी जबाबदारी आता अमित ठाकरेंवर आली आहे.

Share