सोयगावात भाजपचे ४ नगरसेवक शिवसेनेत दानवेंना  झटका

औरंगाबाद– जिल्ह्यातील सोयगाव नगरपंचायतीत  शिवसेनेने भाजपाला मोठा पराभव पत्करावा लागला. केंद्र मंत्री विरूध्द राज्य मंत्री अशी प्रतिष्ठेची लढत सोयगावात बघायला मिळाली.  यात सत्तारांनी बाजी मातर भाजपचा जोरदार पराभव केला. आता पुन्हा एकदा अब्दुल सत्तार यांनी दानवेंना आणखी एक झटका दिला आहे. सोयगाव नगरपंचायतीतील भाजपचे ४ नवनिर्वाचित सदस्य सत्तार यांनी शिवसेनेत खेचून आणले. नगरपंचायतीच्या १७ पैकी ११ जागांवर शिवसेनेने विजय मिळवला होता. आता भाजपकडील ६ पैकी ४ नगरसेवक शिवसेनेने आपल्याकडे वळवले आहेत.

सोयगाव निवडणुकीत भाजपचे ६ नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी ४ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर उर्वरीत २ नगरसेवकही शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. हे सदस्य देखील शिवसेनेत आल्यास भाजपचे संख्याबळ शून्यावर पोहोचू शकते. भाजपसाठी आणि पर्यायाने दानवेंसाठी हा मोठा पराभव असल्याचं म्हंटल जाईल.

Share