डोंबिवलीत मनसेला मोठा धक्का; माजी नगरसेवक सेनेत प्रवेश करणार

 डोंबिवली : महापालिकेच्या निवडणुकीपुर्वीच मनसेला डोंबिवलीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मनसे दोन माजी नगरसेवक हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मनसेचे गजानन पाटील आणि पुजा पाटील, अशी या दोन नगरसेवकांची नावे आहेत. ते कल्याण ग्रामीण मतदार संघातील आहेत. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश होणार आहेत.

दरम्यान मनसेचे दोन नगरसेवक शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तसेच, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकांनीही आपल्या साथीदारांसह मनसेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती ग्रामीणमधील शिवसेनेच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली. मनसे नगरसेवकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मनसेच्या एका पदाधिकाऱ्याला यासंदर्भात संपर्क केला. त्यांनी यासंदर्भात आपणास काही माहिती नसल्याचे सांगितले.

Share