मलिकांना दिलासा नाहीच; न्यायालयीन कोठडीत वाढ

मुंबई : मनी लाँड्रींग प्रकरणात कारागृहात असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्यांना २० मे पर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान ईडीने अटक केल्याच्या विरोधात नवाब मलिकांनी उच्च न्यायालयात धाव घेतील होती. ईडीची कारवाई चुकीची असल्याचा दावा त्यांनी केला होता. हे प्रकरण २२ वर्षंपूर्वीचे असल्याचे त्यांनी म्हटले होते. पण न्यायालयाने मलिकांची ही याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे मलिकांनी सर्वोेच्च न्यायलयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्या. डी.वाय. चंद्रचूड आणि सुर्यकातं यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही मलिक यांना दिलासा दिला नाही.

काय आहे प्रकरण?

दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी ईडीने त्यांच्याविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. ईडीने नवाब मलिकांच्या विरोधात ५ हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

Share