“नोटाबंदीचे धोरण भारतीय अर्थव्यवस्थेला अडचण निर्माण करणारे आहे. केंद्र सरकारच्या धोरणाचा हा पराभव आहे. हे कशामुळे घडलं व पुढे नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारने काय उपाययोजना केली हे केंद्र सरकारने संपूर्ण चौकशी करून जनतेला माहिती द्यावी,” अशी मागणीही दिलीप वळसे पाटील यांनी केली.
हनुमानाचा जन्म हा वाद अनावश्यक
“हनुमानाचा जन्म अंजनेरीला झाला की किश्कंदला झाला हा वाद अनावश्यक आहे याला फार महत्त्व देऊ नका,” अशा शब्दात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सुनावले आहे. दरम्यान महागाई, बेरोजगारी, टंचाई यासारखे अनेक प्रश्न देशासमोर आहेत याकडे लक्ष द्या असेही दिलीप वळसे पाटील म्हणाले. आज सगळे ठरवून चालले आहे. जे विषय देशासमोर नाहीत ते विषय काढून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राम जन्म आणि हनुमान जन्म कुठे झाला. हा विषय आजचा नसल्याचेही दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांना धमक्या आल्या आहेत. याबाबत बोलत असताना गृहमंत्री @Dwalsepatil म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असून जे कुणी दोषी असतील त्यांना कडक शिक्षा केली जाईल. #NCP pic.twitter.com/H10cG3Tpyf
— NCP (@NCPspeaks) May 31, 2022