“मोठा दगड” आणि ….सोमय्यांनी पोस्ट केला नवीन व्हिडीओ

मुंबई- पुणे महापालिकेत भाजपा नेते किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांकडून झालेल्या हल्ल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून आता कारवाईची मागणी केली जात आहे. दरम्यान किरीट सोमय्या यांनाही रुग्णलायातून डिस्चार्ज मिळाला असून त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे.

सोमय्यांवर हल्ला झाल्यानंतर त्यांना शिवसेना जिवे मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला. खुद्द सोमय्या यांनी व्हिडीओ शेअर करत मला पुणे महानगरपालिकेच्या मुख्यालयी मारण्याचा कट रचला गेला होता असा आरोप करत त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा दगड घेवून गाडीला कसे घेरण्यात आल्याच त्या व्हिडोओमध्ये दिसून येत आहे. दरम्यान सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह महिला आणि कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Share