संजय राऊतांच्या जामिनाबाबत मोठी अपडेट; जामीन रद्द होणार?

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीने हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता संजय राऊतांचा जामीन कायम राहणार की रद्द होणार? याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.

संजय राऊत यांना जामीन देताना पीएमएलए कोर्टानं ओढलेले तीव्र ताशेरेही या निकालातून वगळण्याची मागणी तपास यंत्रणेकडून हायकोर्टात करण्यात आली आहे. दरम्यान, पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांची अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत पीएमएलए कोर्टानं ईडीच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले होते. दिवाणी खटल्यासाठी पीएमएलए कायदा लागू केला असल्याचे ताशेरे कोर्टाने ओढले होते. त्यानंतर राऊतांची ९ नोव्हेंबर २०२२ ला सुटका करण्यात आली होती. त्यांच्या सुटकेनंतर जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे.

Share