राज ठाकरेंचं अटक वॉरंट रद्द; परळी कोर्टाचा निर्णय

परळी : महाराष्ट्र नवमिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परळी कोर्टाने राज ठाकरे यांचे अटक वारंट परळी कोर्टाने रद्द केले आहे. यासोबतच त्यांना ५०० रुपयांचा दंड रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

चिथावणीखोर वक्तव्य आणि‎ मनसेच्या कार्यकर्त्यांनी बसवर‎ केलेल्या दगडफेक प्रकरणी तारखेला सतत गैरहजर राहिल्याने परळी‎ न्यायालयाने राज ठाकरेंना‎ अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. त्या प्रकरणात जामीन घेण्यासाठी राज ठाकरे हे परळी कोर्टात हजर झाले होते. कोर्टाने राज ठाकरे गैरहजर का असल्याबद्दल विचारणा केली. राज ठाकरे हे मध्यंतरी रुग्णालयामध्ये होते, याची माहिती राज यांच्या वकिलांनी दिली. त्यानंतर कोर्टाने ५०० रुपयांचा दंड ठोठावत वॉरंट रद्द केलं आहे.

Share