बिरभूम हिंसाचाराची चौकशी सीबीआयकडे, न्यायालयाचे आदेश

कोलकाता-  पश्चिम बंगालमधील बीरभूम येथील हिंसाचाराची सीबीआयला चौकशी करण्याचे आदेश कोलकाता  उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे ममता बॅनर्जींच्या सरकारला मोठा झटका बसला आहे. न्यायालयाने या प्रकरणी ७ एप्रिलपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितले असून, सध्या या प्रकरणाचा तपास एसआयटी करत आहे.

तृणमूल नेत्याच्या हत्येनंतर 22 एप्रिल रोजी हा हिंसाचार घडला होता. एकाच वेळी 11 लोकांना जिवंत जाळण्यात आले होते. त्या प्रकरणाचा तपास एसआटी करत  होतं. परंतू आता कोलकाता उच्च न्यायालयाने या तपासाचे आदेश सीबीआयकडे सोपवण्याचे सांगितले आहे. तसेच याप्रकरणी आतापर्यंत जणांना अटक करण्यात आली असून, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.

Share