शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का, सरनाईकांची संपत्ती जप्त

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहूणे श्रीधर पाटणकर यांची संपत्ती जप्त केल्यानंतर आता शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची ११.३५ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

NSEL घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून प्रताप सरनाईक यांना अनेक समन्स पाठवण्यात आले होते. त्यांच्या मुलाचीही चौकशी करण्याचा ईडीने प्रयत्न केला होता. मात्र याच प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली आहे. त्यांची ठाण्यातील ११ कोटी ३५ लाखाची संपत्ती जप्त केली आहे. यात ठाण्यातील दोन जमिनींचा समावेश आहे. या जमिनींची किंमत एवढी असल्याचं सांगितलं जात आहे.

काय आहे घोटाळा?

NSEL घोटाळा प्रकरणात संचालकांसाह २५ जणांविरोधात मनी लॉन्ड्रींग प्रतिबंधक कायद्यानुसार चौकशी सुरु होती. २०१३ मध्ये याप्रकरण आर्थिक गुन्हे शाखेळे FIR दाखल केला होता. त्यानतंर ईडी हा तपास आपल्या ताब्यात घेत चौकशी सुरु केली. या घोटाळ्यातील गुंतवणूकीची रक्कम आरोपींनी रिअल इस्टेटमध्ये वापरल्याचं समोर आलं होतं. तब्बल १३ हजार गुंतवणूकदारांच्या ५६०० कोटींच्या रकमेचा घोटाळा असल्याचा आरोप आहे.

Share