भाजप आ. नितेश राणेंना मोठा धक्का

मुंबई : शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं आ. नितेश राणेंचा अटकपुर्व जामीन नाकरला आहे. न्यायमूर्ती सी.व्ही. भडंग यांनी हा निकाल दिला असुन राणे यांच्यावर कणकवली पोलीस स्टेशन मध्ये हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.

संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांचा सहभाग असल्याचे पुरावे आहेत. तसंच ही घटना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ अधिवेशनाच्या वेळी खिल्ली उडवण्यापूर्वी घडलेली आहे. त्यामुळे राजकीय सूड म्हणून नितेश यांच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही, असा दावा पोलिसांनी गुरुवारी उच्च न्यायालयात केला. न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर नितेश यांच्या याचिकेवर सोमवारी निर्णय देण्याचे स्पष्ट केलं होतं.

नेमकं प्रकरण काय?
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक प्रचारावेळी शिवसेना पदाधिकारी संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्याविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याविरोधात नितेश राणे यांनी सत्र जिल्हा न्यायालायत अटकपूर्व जामीन अर्ज केला होता.

Share