पंजाब विधानसभेच्या निवडणुकीची तारीख बदलली

नवी दिल्ली : पंजाब विधानसभेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. पंजाबमध्ये १४ फेब्रुवारी रोजी होणारी निवडणूक आता २० फेब्रुवारीला होणार आहे. येत्या १६ फेब्रुवारी रोजी संत रविदास जंयती पावन पर्व आहे. त्यामुळे पंजाबमधील एक मोठा वर्ग वाराणसीत जाऊ शकतो. त्यामुळे मतदान घेतलं तर एक मोठा वर्ग मतदानापासून वंचित राहू शकतो.  म्हणून मतदान चार दिवसांनी पुढे ढकलावं अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांनी केली होती.

पंजाब विधानसभेसाठी १४ फेब्रुवारी रोजी मतदान घेण्याच निर्णय निडणूक आयोगाने घेततला होता. परंतु, रविदास यांची जयंती असल्याने ही निवडणूक पुढे ढकरण्यात यावी अशी मागणी पंजाबमधील अनेक राजकीय पक्षांनी केली होती. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत विचार करण्यासाठी आज बैठक बोलवली होती. या बैठकीत सर्व राजकीय पक्षांची बाजू विचारात घेत निडवणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

 

Share