गोव्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर

गोवा :  देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणील सुरुवात झाली आहे. गोव्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. अशात आता एक मोठी बातमी गोव्यातून समोर आली आहे. गोव्यात सध्या भाजपा १७ जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस १३ , महाराष्ट्रवादी गोमंतक-५, आम आदमी पार्टी एका जागेवर आघाडीवर आहे.

दरम्यान गोव्यात काॅँग्रेस आणि भाजपमध्ये काॅँटे की टक्कर दिसून येत आहे. महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री प्रमोद सावंत  पिछाडीवर आहेत. सोबतच अपक्ष उत्पल पर्रिकर देखील पिछाडीवर आहेत. तर सुधीन ढवळीकर आघाडीवर आहेत. शिवसेनेने अद्याप खात उघडलेलं नाही.

तर दुसरीकडे गोव्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याच्या शक्यतेने काँग्रेस आणि भाजपने आत्तापासूनच जुळवाजुळव सुरु केली आहे. हे दोन्ही पक्ष बहुमत न मिळाल्यास सत्तास्थापन कशी करायची, याचे आकडे बांधत आहेत. त्यामुळे आता गोव्यात अंतिम निकाल काय लागणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Share