UP Assembly Election Result 22 : भाजपाने गाठला २०० चा आकडा

उत्तरप्रदेश –  देशाच्या राजकारणात महत्वाचं स्थान असलेल राज्य उत्तरप्रदेश आहेे. त्यामुळे या राज्यात कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्यासाठी सर्व पक्षांनी निवडणूकीवेळी सर्वतोपरी कस लावला होता. आज या राज्यात कोण अव्वल ठरणार हे स्पष्ट होणार आहे. सध्या मतमोजणीला सुरुवात झाली असून भाजपाने जवळपास २०० पेक्षा जास्त आघाडीवर असल्याचं बघायला मिळत आहे. त्यामुळे उत्तरप्रदेशात योगी हेच मुख्यमंत्री होणार
असल्याचं दिसत आहे.

उत्तर प्रदेश विधानसभेत ४०३ जागा असून पक्षांना बहुमतासाठी २०२ सदस्यांचे संख्याबळ लागेल. बहुतांश मतदानोत्तर अंदाजानुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र यावेळी भाजपासमोर गेल्या निवडणुकीतील संख्याबळ राखण्याचं आव्हान आहे. त्यामुळे भाजप सत्तेत येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

गोरखपूर मतदार संघातून योगी आदित्यनाथ जवळपास १२ हजार मतांनी  आघाडीवर आहेत . तर सपाचे अखिलेश यादव करहल मधून १० हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर बसपा सध्यातरी क्रमांक तीन वर आहे. तर भाजपामधून बाहेर पडलेले तीन मंत्री सध्या त्यांच्या मतदार संघातून पिछाडीवर आहे.

Share