मोफत गॅस नुसतीच घोषणा; पटोलेंचा केंद्र सरकारवर निशाणा

मुंबई :  एकीकडे लोकांचे उत्पन्न घटत असताना दुसरीकडे महागाई मात्र  वाढत असून सामान्य जनतेवर हा दुहेरी मार आहे. निवडणुकीच्या प्रचारात एपीजी गॅस मोफत देण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली होती. पण निवडणूका होताच मोफत गॅस तर सोडाच उलट आहे त्याच गॅसची किंंमत वाढवली असल्याची  टिका काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

रशियाकडून कच्चे तेल सवलतीच्या किंमतीत घेऊनही इंधन दरवाढ केली आहे. डिझेलची ठोक खरेदी करणारे रेल्वे, एसटी महामंडळ, ऊर्जा प्रकल्प, सिमेंच उत्पादन, माॅल्स यांच्यासाठीचे डिझेल २५ रुपये प्रतिलिटरने महाग केले आहे. यामुळे महागाई वाढून त्याचा फटकाही शेवटी सर्वसामान्यांनाच बसणार आहे असेही पटोले यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान पेट्रोले, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरात केंद्रातील मोदी सरकारने वाढ करुन सामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळले आहे. निवडणुकीचे दिवस असताना इंधन दरवाढ रोखून ठेवली होती पण देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणूका संपतानच भाजपने जनतेला महागाईची भेट दिली असल्याची टिका पटोले यांनी केली आहे.

Share