२०२४ पर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारतात येऊ शकतो – कपिल पाटील

कल्याण- २०२४ पर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारतात येऊ शकतो असं विधान केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कल्याण येथे आयोजित एका कार्यक्रमात केला आहे. भारत- पाकिस्तान मुद्दा हा कायम तणाव असतो म्हणून या वक्तव्याने विरोधी टिका करतील का असा सवाल निर्माण झाला आहे.

 

कल्याणमध्ये सुभेदार वाडा कट्टातर्फे स्वर्गीय राम कापसे व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. या व्याख्यानमालेमध्ये बोलताना कपिल पाटील यांनी पाकव्याप्त काश्मीरविषयी विधान केलं. तसेच आता कांदे,बटाटे आणि तूरडाळ यातून बाहेर पडायला हवे असे मतही व्यक्त केले आहे.

Share