बाॅलिवूड अभिनेत्री काजोलला कोरोनाची लागण

मुंबई- अभिनेत्री काजोला करोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने याबाबतची माहिती दिली असून काजोलने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे. यासोबत मुलगी न्यासाचा फोटो शेअर करत तिची आठवण येत असल्याचेही याद्वारे सांगितले आहे.

https://www.instagram.com/p/CZVt3olJl11/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेत्री काजोल ही इन्स्टाग्रामवर कायम सक्रीय असते.  तिने इन्स्टाग्रामवर तिची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. ही पोस्ट शेअर करताना तिने मुलगी न्यासाचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोला कॅप्शन देताना काजोल म्हणाली की, “माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला माझे लाल नाक कोणालाही दाखवायचे नाही. त्यामुळे मला जगातील सर्वात गोड हसणे शेअर करणे योग्य वाटले. मिस यू न्यासा देवगण”

Share