पवार-दाऊद टोळी महाराष्ट्राची वाट लावणार, बाळासाहेबांच्या भाषणाचा सोमय्यांनी केला खुलासा

मुंबई-  सोमय्या यांनी  नवाब मलिक यांच्या अटकेनंतर महाविकासआघाडीवर हल्लाबोल केलाय. सोमय्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करत कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आरोप केला. बाळासाहेब ठाकरे भाषण द्यायचे की दाऊद आणि शरद पवारांची जोडी महाराष्ट्राची वाट लावणार आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले.

किरीट सोमय्या म्हणाले की, नवाब मलिकांच्या प्रकरणात देशद्रोह आहे त्यामुळे यात एनआयए आहे. परदेशातील व्यवहार निघू शकतात, दाऊदच्या सांगण्यावरून देशात काय काय झालं हे सगळ बाहेर येणार आहे. पुढे बोलतांना सोमय्या म्हणाले की, स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे भाषणात म्हणायचे की, हे शरद पवार आणि दाऊद या महाराष्ट्राची वाट लावणार,आता या टोळीतला एक उध्दव ठाकरेंचा जोडीदार आहे. असा आरोप सोमय्यांनी केला या दरम्यान केला.

‘डर्टी डझन’मध्ये कोणाचा समावेश-

१. अनिल देशमुख
२. नवाब मलिक
३. अनिल परब
४. संजय राऊत
५. सुजित पाटकर
६. भावना गवळी
७. आनंद आडसुळ
८. अजित पवार
९. हसन मुश्रीफ
१०. प्रताप सरनाईक
११. रविंद्र वायकर
१२. जितेंद्र आव्हाड

 

Share