मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपा काढणार भव्य मोर्चा

मुंबई- मागील महिन्या राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने चौकशी करून अटक केली होती.  यावर भाजपने त्यांच्या राजिनाम्याची मागणी लावून धरली आहे. यासाठी भाजप उद्या मुंबई येथे विरोट मोेर्चा काढणार आहेत. याप्रकरणी भाजपा नेते आशिष शेलार यांच्यासहित इतर नेत्यांनीही पोलीस आयुक्तांची भेट घेतली.

दरम्यान राज्याचं अर्थसंकलपीय अधिवेशन सुरु आहे. यावेळी भाजप आमदार विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून जोरदार घोषणाबाजी करत आहेत.तसेच मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. मलिकांच्या राजीनाम्यासाठी राज्य सरकार कोणत्याही प्रकारच्या हालचाली करताना दिसत नसल्याने किंवा मलिकांंवर एवढी कृपा कशासाठी असा सवाल विचारत भाजप उद्या मुंबईत विराट मोर्चा काढणार आहेत.

या मोर्चाला अद्याप मुंबई पोलिसांकडून परवानगी देण्यात आलेली नाही. याबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “भेट झाली असून अधिकृत परवानगी मागितली आहे. पोलीस न्यायीक पद्धतीने वागतील, राजकीय नाही अशी आमची अपेक्षा आहे. परवानगी न दिल्यास परवानगीशिवाय मोर्चा काढणार”.

Share