राहुल कनाल हा मुंबईतील ‘नाईट लाईफ’ गॅंगचा सदस्य – नितेश राणे

मुंबई : आयकर खात्याने आज सकाळी शिवसेना नेत्याच्या घरावर धाडी टाकल्या आहेत. यात राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचे निकतवर्तीय राहुल कनाल यांच्या घरावर प्रथम धाड टाकण्यात आली. तर दुसरीकडे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परबांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या संजय कदम यांच्या घरी देखील आयकर विभागानं धाड टाकली आहे. यानंतर राज्यातल्या राजकराणात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरु झाल्या आहेत.  याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे  यांनी राहुल कनाल  हा मुंबईतील नाईट लाईफ गॅंगचा सदस्य असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

यासंदर्भात निलेश राणे प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना म्हणाले की, राहुल कनाल हा मुंबईतील नाईड लाईफ गॅंगचा सदस्य असून कॅफे बॅन्ड्रा नावाचा तो एक रेस्टॉरंट चालवतो. पण त्याठिकाणी अनधिकृत व्यवहार सुरू असतात. कोरोना काळात कोवीड सेंटर निघाले. यामध्ये देखील त्याचा हस्तक्षेप आहे. राहूल कनाल यांना थेट शिर्डी संस्थानचे विश्वस्त म्हणूनच का पाठवलं? कोण आहे त्याच्यामागे? त्याच्यावर एवढी कृपादृष्टी कशासाठी? १२ आमदारांच्या यादीत देखील राहुल कनालचे नावही सुचवले होते,. राहूल कनालकडे एवढा पैसा आला कुठून? यावर योग्य तपास झाला पाहिजे.  असे नितेश राणे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

Share