गोव्यात भाजपची पहिली यादी जाहीर,

पणजी :  गोवा विधानसभा निवडणुकीची भाजपची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकुण ३४ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे.  गोवाचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी ४० जागा पैकी ३४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

या यादीत गोव्याचे माजी  दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी नाकरणात आली आहे. त्यामुळे उत्पल पर्रिकर आता पुढे काय भूमिका घेतात याकडे सर्वाच्या नजरा लागल्या आहेत.

या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, पणजीत जे विद्यमान आमदार आहेत त्यांनाच उमेदवारी दिली आहे. उत्पल पर्रिकर आणि पर्रिकरांचा परिवार हा आमचा आहे, ते आमचे जवळील आहेत. आम्ही उत्पल पर्रिकर यांना दोन जागांचा पर्याय दिला होता. त्या दोन जागांपैकी एका जागेला त्यांनी यापूर्वीच नकार दिला होता दुसऱ्या जागेच्या संदर्भात चर्चा सुरू आहे. भाजपने पर्रिकरांच्या कुटुंबाचा नेहमीच सन्मान केला आहे असं फडणवीस म्हणाले.

Share