मुंबई- छोट्या पडद्यावरील कार्यक्रम बिग बॉस शो हा लोकप्रिय मानला जातो. बिग बॉसचे हे १५ वे वर्ष सुरू आहे. यावर्षीचे विजेता कोण असणार याकडे अनेकांचे लक्ष लागून होते.अखेर काल रात्री बिग बॉसच्या विजेत्याची घोषित करण्यात आली.अभिनेत्री तेजस्वी प्रकाश या वर्षीची विजेती ठरली आहे, तर प्रतिक सहजपाल हा उपविजेता ठरला आहे .
#BB15 ke 17 hafte huye samapt aur usike saath crown hui Tejasswi as the winner of the trophy!
Did this moment send a shiver down your spine too? 😍#BiggBoss @justvoot @itsmetejasswi pic.twitter.com/27zj6J9IHK
— ColorsTV (@ColorsTV) January 31, 2022
या कार्यक्रमात १३ व्या पर्वाचा मानकरी आणि दिवंगत अभिनेता सिध्दार्थ शुक्लाला ट्रिब्यूट देण्यात आलं. दरवर्षीप्रमाणे विजेता घोषित करण्याआधी अनेक सेलिब्रेटींचे डान्स् झाले. तसेच सिद्धार्थ शुक्लाला ट्रिब्यूट देण्यासाठी शहनाज गिलने तु यहीं है या गाण्यावर डान्स केला.
तेजस्वी प्रकाश, शमिता शेट्टी, करण कुंद्रा, प्रतीक सहजपाल आणि निशांत भट्ट हे पाच फयनालिस्ट स्पर्धक पाहायला मिळाले. तर निशांत भट्टने १० लाख रुपये घेत अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शमिता शेट्टी ही बाद झाली आणि तेजस्वी प्रकाश, प्रतीक सहजपाल आणि करण कुंद्रा हे तिघेजण टॉप ३ स्पर्धक ठरले.या मधुन विजेता कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताच करण कु्ंद्रा ही बाद झाला आणि तेजस्वी व प्रतीक हे दोघेजण शेवटच्या शर्यतीमध्ये उतरले. त्यानंतर अखेर सूत्रसंचालक अभिनेता सलमान खानने तेजस्वी प्रकाशला यंदाच्या बिग बॉसची विजेती म्हणून घोषित केले. तर प्रतीक हा उपविजेता ठरला. तेजस्वी प्रकाशला बिग बॉस १५ व्या सिझनची ट्रॉफी देण्यात आली. त्यासोबत तिला ४० लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले.
बिग बाॅसमधील तेजस्वीचा प्रवास-
बिग बॉस च्या घरातील तेजस्वीचा प्रवास धमाकेदार ठरला.करण सोबतची तिची रोमॅन्टिक केमेस्ट्री सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तेजस्वीला बिग बॉसमध्ये तीन फायदे झाले आहेत. यातील पहिला फायदा म्हणजे ती या शो ची विजेती ठरली. दुसरा म्हणजे एकता कपूरच्या नागिन ६ या आगामी मालिकेत ती नागिनच्या भूमिकेत दिसणार आहे. तर तिसरा म्हणजे तिचे आणि करण कुंद्राचे रिलेशनशिप. बिग बॉस १५ ची ट्रॉफी जिंकल्यानंतर तेजस्वी प्रकाशने कुटुंब आणि चाहत्यांचे आभार मानले. त्यासोबत तिने करण कुंद्राचेही आभार मानले आहेत.
अभियांत्रिकी शिक्षण ते अभिनेत्री –
तेजस्वी प्रकाशने अभिनयाच्या जगात येण्यापूर्वी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. आत्तापर्यंत तेजस्वी प्रकाशने अनेक सुपरहिट टीव्ही शोमध्ये भाग घेतला आहे. ‘स्वरागिनी’पासून ‘पहरेदार पिया की’ आणि ‘सिलसिला बदलते रिश्तों का 2’ पर्यंत अनेक शोमध्ये तेजस्वी प्रकाशने मुख्य भूमिका साकारल्या आहेत.