नाशिकमध्ये बसला आग लागून; ११ जणांचा आगीत होरपळून मृत्यू

नाशिक :  यवतमाळ वरून मुंबई कडे जाणारी डंपर-खासगी बसचा आज सकाळी पहाटेच्या सुमारास नाशिक मध्ये अपघात झाला. पहाटेच्या सुमारास बसमधील अनेक प्रवासी झोपेत असतानाच काळाचा घाला आला. डंपर-खासगी बसला आग लागून ११ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अनेक जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही आग एवढी भीषण होती की काही वेळात झालेल्या स्फोटाने परिसरातील नागरिक खडबडून जागे झाले. त्यानंतर घटनेची माहिती आगीसारखी शहरात पसरली. काहींनी खिडकीतून उड्या मारल्या, तर काही आगीतच होरपळले. या भीषण दुर्घटनेबद्दल राज्यभरातून हळहळ व्यक्त होते आहे.

११ जणांचा मृत्यू, २० प्रवाशी जखमी
नाशिकमधील बस आग दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती जिल्हाधिकारी गंगाठरन डी यांनी दिली आहे. तर २० प्रवासी जखमी असून यापैकी एकजण गंभीर जखमी असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातून दुसरीकडे पुढील उपचारांसाठी हलवण्यात येणार असल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहचले असून पाहणी केली जात आहे. पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी या अपघाताची पुष्टी करत माहिती दिली आहे की, ”या आगीत होरपळून काही जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे.

 

यवतमाळकडून आलेली प्रवासी बस आणि अमृतधामकडून येणाऱ्या मालवाहू ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. यानंतर बसने पेट घेतला. बस इंजिन फुटलं होतं आणि डिझेलने पेट घेतला होता. पूर्ण बस जळू लागली, मागील बाजूने लोक आपला जीव वाचवण्यासाठी उतरत होती. पेटलेल्या अवस्थेत मिळेल त्या दिशेने सैरभैर पळत होती. रस्त्यावर काहीजणांचा पूर्णपणे कोळसा झाला.

बसमधील प्रवाशांची  यादी

 

बसमधील प्रवाशांच्या माहिती साठा संपर्क साधा

आज पहाटे नाशिक शहरामध्ये ट्रेलर व ट्रॅव्हल बस यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातामुळे जखमी व मृत व्यक्ती विषयी अधिक माहिती संबंधितांना देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती व्यवस्थापन शाखा आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालय नाशिक येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला असून सदर नियंत्रण कक्षा चे दुरध्वनी क्रमांक खालील प्रमाणे आहेत . +912532572038 ,+912532576106 अशी माहिती नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे

Share