मनमाड (जि. नाशिक): येवला-मनमाड महामार्गावरील अनकवाडे शिवारात कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आढळून झालेल्या भीषण अपघातात ४ तरुण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला. मंगळवारी मध्यरात्री हा अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की, यात कारचा अक्षरशः चुराडा झाला.
या अपघातात पाच मित्रांपैकी तौफिक शेख, दिनेश भालेराव, प्रवीण सकट, गोकुळ हिरे या चौघांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्वजण मनमाडचे रहिवासी होते. अजय वानखेडे हा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले आहे.
तौफिक शेख, दिनेश भालेराव, प्रवीण सकट, गोकुळ हिरे आणि अजय वानखेडे हे मित्र मंगळवारी रात्री उशिरा मारुती कार (क्र. एम. एच.४१/व्ही.७३१७) मधून येवल्याजवळील अनकवाडे शिवारात असलेल्या फौजी ढाब्यावर जेवायला गेले होते. जेवण करून मनमाडकडे येताना अंकाई किल्ल्याजवळ कारचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आढळून हा भीषण अपघात झाला. यात तौफिक शेख, दिनेश भालेराव, प्रवीण सकट, गोकुळ हिरे या चौघा मित्रांचा जागीच मृत्यू झाला, तर अजय वानखेडे हा गंभीर जखमी झाला.
या अपघातात मारुती कारचा पार चुराडा झाला. अपघाताची माहिती मिळताच मयताच्या नातेवाईकांनी मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली. अपघातामुळे पुणे-इंदौर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.