इंद्राणी मुखर्जीच्या अर्जावर सीबीआयचे कोर्टाला उत्तर; ३ मार्चला होणार सुनावणी

देशभरात गाजलेल्या शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने शीना बोरा ही जिवंत असल्याचा दावा केला होता. यासंदर्भात इंद्राणीने सीबीआयच्या विशेष कोर्टात याचिका दाखल केली होती. सीबीआयने आरोपी इंद्राणी मुखर्जीच्या अर्जावर उत्तर दाखल करण्यासाठी विशेष सीबीआय न्यायालयाकडे १४ दिवसांचा अवधी मागितला होता.यावर आता इंद्राणी मुखर्जीच्या अर्जावर सीबीआयने कोर्टाला उत्तर दिले या प्रकरणाची सुनावणी ३ मार्चला होणार आहे.

इंद्राणी मुखर्जीचे पत्र आणि दावा

इंद्राणी मुखर्जीने सीबीआय संचालकांना लिहिलेल्या पत्रात दावा केला आहे की, ती नुकतीच तुरुंगात एका महिलेला भेटली होती. ज्याने तिला सांगितले की ती काश्मीरमध्ये शीना बोराला भेटली होती. आता सीबीआयने काश्मीरमध्ये शीना बोराचा शोध घ्यावा, असे इंद्राणीने पत्रात म्हटले आहे. इंद्राणी २०१५ पासून मुंबईतील भायखळा कारागृहात बंद आहे. इंद्राणीने सीबीआयच्या विशेष कोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी ३ मार्चला होणार आहे. मात्र इंद्रायणी मुखर्जीच्या खळबळजनक दाव्याने शीना बोरा हत्याकांडात नवीन ट्वी्स्ट येण्याची शक्यता आहे.

Share