मोदींनी शिवजयंतीदिनी क्षमा मागून प्रायश्चित करावे – पटोले

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसने मुंबईतील उत्तर भारतीय श्रमिकांना मोफत रेल्वे तिकीटे दिली आणि त्यामुळे कोरोना उत्तरप्रदेश, बिहार, उत्तराखंडमध्ये पसरला अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या विधानानंतर आता काँग्रेस  पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या  जयंतीदिनी महाराष्ट्राची माफी मागून प्रायश्चित करावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी

यावेळी त्यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदी व भाजपने महाराष्ट्राची माफी मागावी, यासाठी काँग्रेसच्या वतीने गेल्या तीन दिवसांपासून मुंबई व इतर काही जिल्ह्यांत आंदोलन करण्यात येत आहे. मात्र त्याचबरोबर या आंदोलनाचाच पुढचा टप्पा म्हणजे मोदी यांनी माफी मागावी यासाठी देवेंद्र फडणवीस यांना पत्रे पाठविण्यात येतील.

 

तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र दिल्लीचे तख्त आणि अहंकारी इंग्रजांसमोर कधीही झुकला नाही. त्यामुळे दिल्लीच्या सत्तेसमोर गुडघे टेकून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी खेळू नका, राज्यातील जनता कधीही माफ करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त माफी मागून तुमच्या पापाचे प्रायश्चित करा, अशा आशयाचे पत्र देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात येणार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

Share