मुंबई : येत्या शैक्षणिक वर्षातील सीईटी परीक्षा विविध अभ्यासक्रमांची प्रक्रिया सीईटी सेलमार्फत सुरु आहे. सीईटी सेलकडून शैक्षणिक वर्ष २०२३३-२३ साठी उच्च व तंत्रशिक्षण विभाग तसेच कलाशिक्षण विभागाच्या सीईटीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. उच्च शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा दि. ३ ते १० जून २०२२, तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षा दि. ११ ते २८ जून तर कलाशिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा १२ जून २०२२ रोजी घेण्यात येणार आहे. अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता राज्य सीईटी कक्षामार्फत उच्च शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा दि.03 जून ते 10 जून, 2022, तंत्र शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा दि.11 जून ते 28 जून, 2022 तसेच कला शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा दि.12 जून, 2022 रोजी घेण्यात येणार आहेत.
— Uday Samant (@samant_uday) March 25, 2022
अभ्यासक्रमनिहाय सीईटी परीक्षांची माहिती पुस्तिका, वेळापत्रक/बदल आणि अभ्यासक्रम सीईटीच्या संकेतस्थळावर http://mahacet.org उपलब्ध आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.
सध्या सीईटी सेलकडून या परीक्षासाठी नोंदणी सुरु आहे. तिन्ही विभागांचे मिळून आतापर्यत एकूण ४ लाख ५८ हजार ७२१ विद्यार्थांनी नोंदणी केली आहे. तर यापैकी ३ लाख ७० हजार ३०४ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केले आहेत. दरम्यान अर्ज भरताना विद्यार्थ्यांना ज्या अडचणी येत आहेत, त्याचे निरासरन सीईटी सेलकडून करण्यात येत आहे.