सीईटीच्या तारखा जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा

मुंबई :  येत्या शैक्षणिक वर्षातील सीईटी परीक्षा विविध अभ्यासक्रमांची प्रक्रिया सीईटी सेलमार्फत सुरु आहे. सीईटी सेलकडून शैक्षणिक वर्ष २०२३३-२३ साठी उच्च व तंत्रशिक्षण विभाग तसेच कलाशिक्षण विभागाच्या सीईटीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. उच्च शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा दि. ३ ते १० जून २०२२, तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षा दि. ११ ते २८ जून तर कलाशिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा १२ जून २०२२ रोजी घेण्यात येणार आहे. अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

अभ्यासक्रमनिहाय सीईटी परीक्षांची माहिती पुस्तिका, वेळापत्रक/बदल आणि अभ्यासक्रम सीईटीच्या संकेतस्थळावर http://mahacet.org उपलब्ध आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.

सध्या सीईटी सेलकडून या परीक्षासाठी नोंदणी सुरु आहे. तिन्ही विभागांचे मिळून आतापर्यत एकूण ४ लाख ५८ हजार ७२१ विद्यार्थांनी नोंदणी केली आहे. तर यापैकी ३ लाख ७० हजार ३०४ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केले आहेत. दरम्यान अर्ज भरताना विद्यार्थ्यांना ज्या अडचणी येत आहेत, त्याचे निरासरन सीईटी सेलकडून करण्यात येत आहे.

Share