सोमय्या हल्ल्या प्रकरणी, चंद्रकांत पाटलांचं अमित शहांना पत्र

मुंबई- किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर पुणे महापालिकेत झालेल्या हल्ल्या प्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Bacchu Patil)  यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah)  यांना पत्र लिहीत शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. सोमय्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांनी पत्राद्वारे केला आहे.

सत्तेचा दुरोपयोग करत बंगाल सारखी परिस्थिती महाराष्ट्रात हे मविआ सरकार  निर्माण करत आहे. त्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात लक्ष घालून या प्रकरणी कारवाई करावी. तसेच  केंद्रीय मंत्री नारायण राणे एक वाक्य बोलले तर त्यांच्यावर आक्षेप घेत त्यांना अटक करण्यात आली. नितेश राणेंचा हत्या प्रकरणासोबत कथित संबंध असताना त्यांना अटक करण्यात आली. अमित शाह यांनी महाराष्ट्राच्या डिजीला विचारणा केली पाहिजे, की असं कसं घडलंय? किरीट सोमय्यांवर हल्ला झाला त्यावेळी केंद्रीय सुरक्षा दलाच्या पोलिसांना देखील धक्काबुक्की झाली. सरकारी कामात व्यत्यय आणला गेला. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे, असं चंद्रकांत पाटील यांनी पत्रात म्हंटल आहे.

 

Share