मुंबई : पुण्यातील नवले पुलावर रविवारी रात्री भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातातील जखमींना योग्य ते उपचार मिळण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देखील स्थानिक प्रशासनाला दिल्या असून या अपघातामुळे सदर भागात झालेल्या वाहतूक कोंडी दूर करून वाहनधारकांना त्रास होणार नाही. याची दक्षता घेण्याचे निर्देश देखील वाहतूक पोलिसांना दिले आहेत. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विटद्वारे सांगितले.
पुण्यातील नवले पुलावर रविवारी रात्री भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातातील जखमींना योग्य ते उपचार मिळण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देखील स्थानिक प्रशासनाला दिल्या असून या अपघातामुळे सदर भागात झालेल्या वाहतूक कोंडी दूर करून वाहनधारकांना त्रास होणार नाही. याची दक्षता घेण्याचे निर्देश देखील वाहतूक पोलिसांना दिले आहेत. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विटद्वारे सांगितले.
पुण्यातील नवले ब्रिज येथे आज रात्री टँकरच्या धडकेने झालेल्या अपघातात अनेक वाहने दुर्घटनाग्रस्त झाली. या अपघाताची माहिती कळताच तो नक्की कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला ते शोधण्याचे तात्काळ निर्देश दिले आहे.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 20, 2022
नेमकं काय घडलं?
साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर पंचवीस ते तीस गाड्यांना उडवत वाडगाव पुलाजवळ आदळला. यात सुमारे ६ ते १० जण जखमी झाले आहेत. दरम्यान सुमारे १० वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाता दरम्यान रस्त्यावर ऑइल सांडल्याने रस्ता अधिकच निसरडा झाला त्यामुळे गाड्यांची संख्या अधिकाधिक वाढत गेली.