मुख्यमंत्र्यांच्या सभेचा टिझर रिलीज, १४ मे रोजी सभा

मुंबई:  मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या दणदणीत ३ सभानंतर आता शिवसेनेकडूनही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार असल्याचे दिसत आहे. मुंबई व मराठवाड्यात आपल्या सभा होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यापुर्वीच स्पष्ट केले आहे. आता शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील सभेचा टिझर रिलिज करण्यता आला आहे. १४ मेरोजी बीकेसी मैदानावर मुख्यमंत्र्यांची सभा होत आहे.

शिवसंपर्क अभियान..दिनांक: १४ मे २०२२ | सायं.- ७.०० वाजता
स्थळ : बीकेसी मैदान, मुंबई pic.twitter.com/WJG687Equn

— ShivSena – शिवसेना (@ShivSena) May 8, 2022

टिझरमध्ये बाळासाहेब ठाकरे
टिझरमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचा काही भाग वापरण्यात आला आहे. मी शिवसेना प्रमुख जरूर, पण तुमची ताकद माझ्यासोबत आहे म्हणून मी शिवसेनाप्रमुख आहे, असे यात बाळासाहेब बोलत आहेत. तसेच, प्रत्येक शिवसैनिकाने खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला यायलाच पाहिजे, असे आवाहनही टिझरमध्ये करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री कोणाचा मास्क काढणार?
आगामी मुंबई महाापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. कालच मुंबई पालिकेने मुंबईकरांसाठी ‘सर्वांसाठी पाणी’ हे धोरण जाहीर केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्तेच या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मी १४ तारखेला अनेकांचा मास्क काढणार, असे उद्धव ठाकरेंनी जाहीर केले होते. त्यानंतर आज शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या सभेचा टीझर रिलीज करण्यात आला. त्यामुळे आता १४ तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोणाचा मास्क काढणार, हे पाहावे लागणार आहे.

Share