भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी चित्रा वाघ यांची नियुक्ती

मुंबई : भाजपकडून चित्रा वाघ यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांची भाजपच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी उमा खापरे यांनी भाजपच्या महिला मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं आहे. गेल्या काही दिवसापासून चित्रा वाघ या आक्रमकपणे महिलांचे प्रश्न मांडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून चित्रा वाघ यांच्या खांद्यावर महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

दरम्यान, ही नवी जबाबदारी आल्यानंतर चित्रा वाघ यांनी चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे. तसेच ‘भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देऊन पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला, तो मी नक्कीच सार्थ ठरवेन,’ असे आश्वासनही त्यांनी पक्षश्रेष्ठींना दिले आहे.

Share