चित्राताई, उद्या तुम्ही ब्ल्यू फिल्म टाकून, त्यावरही उत्तर मागाल

पुणे : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एक व्हिडीओ ट्विट करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर गंभीर आरोप केला होता. त्या व्हिडिओमध्ये दिसत असलेली व्यक्ती ही नाना पटोले असल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केलाय. त्याचसोबत ट्विटरवर नाना पटोले यांनी टॅग करत “नाना तुम्ही पण झाडी, डोंगार, हाटीलमध्ये” असा खोचक प्रश्न उपस्थित केला आहे. मात्र, आता चित्रा वाघ यांच्या याच ट्विट विरोधात महिला नेत्यांनी टीकेच रान उठवलं आहे. उद्या तुम्ही ब्ल्यू फिल्म सोशल मीडियावर टाकाल आणि त्याचंही उत्तर मागाल, असं कुठे करतात का चित्रा ताई? अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे.

काय म्हणाल्या रुपाली पाटील-ठोंबरे?

‘मुळात तुम्हाला नाना पटोले यांच्या खासगी आयुष्यातील व्हिडिओ ट्विट टाकण्याचं प्रयोजन काय? तो तथाकथित व्हिडीओ खरा आहे खोटा आहे त्याची पडताळणी केली का?, त्या महिलेने तुम्हाला कोणतीही तक्रार केली का?’, असा सवाल विचारत रुपाली पाटील-ठोंबरे यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘तिला कोणताही त्रास झाला असता आणि त्या महिलेने तुम्हाला तक्रार केली असती तर गोष्ट वेगळी होती. मात्र, तुम्हाला विरोधी पक्षाच्या नेत्याच्या खासगी आयुष्यात सातत्याने ताकझाक करण्याशिवाय दुसरं काम राहिलेले नाही.’ असे खडे बोल रुपाली पाटील यांनी चित्रा वाघ यांना सुनावले आहेत.

नेमकं प्रकरण काय? 

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटरवर व्हायरल व्हिडिओ अपलोड केला. हा व्हिडिओ पोस्ट करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, काय नाना तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलीतं असं म्हणत चित्रा वाघ यांनी ट्विट केलं होतं

दरम्यान त्या व्हिडीओबाबत नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मला बदनाम करण्याचा कट असून व्हिडीओची तपासणी करून कायदेशीर बाजू मांडण्यात येईल, असंही ते यावेळी म्हणाले. या संदर्भात आमची कायदेसंदर्भातील टीम कारवाई करणार असल्याचं सांगितलं. चित्रा वाघ यांच्यासंदर्भात काहीच बोलायचं नसल्याचं ते यावेळी म्हणाले.

Share