काँग्रेस महासचिव प्रियांका गांधींना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

नवी दिल्ली : काॅँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: प्रियांका यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली. त्यांनी स्वत:ला घरीच आयसोलेट करून ठेवले आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्या घरीच क्वॉरंटाईन होणार आहेत. तसेच, त्या क्वॉरंटाईनच्या सर्व नियमांचं पालन करणार आहेत. दरम्यान, प्रियांका गांधींना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान, प्रियांका गांधी यांना दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी ३ जून रोजी प्रियांका गांधी यांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांची आई आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर प्रियांकानं ट्वीट करून सौम्य लक्षणं जाणवत असल्यानं कोरोना चाचणी केल्याची माहिती दिली होती. कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मात्र, त्या होम आयसोलेशनमध्ये होत्या.

राहुल गांधी यांची प्रकृती बिघडली
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना देखील अस्वस्थ वाटत आहे. यामुळे त्यांनी राजस्थानमधील अलवर येथील दौरा रद्द केलाय. राहुल गांधी अलवर येथील नेत्रत्व संकल्प शिबिर कार्यक्रमात उपस्थित राहणार होते.

Share