नितीश कुमारांनी आठव्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

नवी दिल्ली : जेडीयूचे नेते नितीश कुमार यांनी आठव्यांदा बिहाराच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. तर लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपला सोडचिठ्ठी देत नितीश कुमार यांनी महागठबंधनसोबत नवं सरकार स्थापन केलं आहे. बिहारच्या राजभवनात हा शपथविधी सोहळा बुधवारी पार पडला.

भाजप सोबत फारकत घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी ७ पक्षांच्या ‘महागठबंधन’सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये तेजस्वी यादव यांचा आरजेडी आणि इतर विरोधी पक्ष आहेत. मंगळवारी नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला होता. यावेळी १६४ आमदारांची यादी राज्यपालांना सादर करत राजदसोबत सत्तास्थापनेचा दावा केला. यानंतर आज नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

दरम्यान, शपथविधीनंतर माध्यमांशी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव  म्हणाले, बिहार माझं कुटुंब आहे. मी सर्वांचे आभार मानते असं तेजस्वी यांच्या पत्नीनं म्हटलं तर बिहारसाठी ही चांगली गोष्ट घडली. मी सर्वांचे आभार मानते असं तेजस्वी यांच्या आई राबडी देवी यांनी म्हटलं आहे. आम्ही काम करण्यासाठी सत्तेत आलो आहोत असं तेज प्रताप यादव यांनी म्हटलं आहे.

Share