अमृता फडणवीसांवर अश्लील कमेंट करणाऱ्या तरुणाला अटक

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल अश्लील कमेंट्स करणाऱ्या तरुणाला पुण्यातील आळेफाटा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अमित वायकर (रा. कावळे मळा, चाळकवाडी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत भाजपच्या नेत्या आशाताई बुचके यांनी आळेफाटा पोलिसात तक्रार दाखल केली होती.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमित वायकर हा मोबाईलवर फेसबुकवर पोस्ट पाहत होता. यावेळी ठाण्यातील शिवसेना आमच्यासोबत आहे, या मथळ्यात लिहिलेल्या एका बातमीवर त्याची नजर गेली. बातमी वाचून त्यांनी उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल करत कमेंट बॉक्सवर अश्लील टिप्पणी केली. ही टिप्पणी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल होती आणि या टिप्पणीची भाषा अत्यंत अश्लील होती.

अमितने केलेली कमेंट सर्व समाज माध्यमांवर व्हायरल झाली. राजकारणातील एका प्रतिष्ठित आणि मोठ्या व्यक्तीच्या पत्नीबद्दल असे शब्द वापरल्याने खळबळ उडाली. याची दखल जुन्नरच्या भाजप नेत्या आशाताई बुचके यांनी घेतली. त्यांनी या तरुणा संदर्भात थेट आळेफाटा पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी देखील घटनेचे गांभीर्य ओळखत अमित वायकर नावाच्या तरुणाला ताब्यात घेऊन अटक केली आहे. वायकर याने अश्लील कमेंट्स केल्याचे लक्षात आल्यावर आळेफाटा पोलीस ठाण्यात भाजपच्या नेत्या आशाताई बुचके यांनी तक्रार केली. पोलीसांनी अमित वायकर याला ताब्यात घेतले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर करीत आहेत.

Share