मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.मुंबई उच्च न्यायलयाने नवाब मलिक यांच्या ईडीच्या अटकेबाबतची याचिका १५ मार्चपर्यत राखून ठेवली आहे. त्यामुळे आता या यचिकेवर मंगळवारी होणार आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या हस्तकांकडून मालमत्ता खरेदी केल्याच्या प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेल्या मंत्री नवाब मलिकांची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. ७ मार्चला झालेल्या सुनावणीत न्यायालयाने मलिक यांना २१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Bombay High Court reserves Maharashtra Minister Nawab Malik's plea over his arrest by ED for March 15. Malik had termed his arrest as 'wrong and illegal.' pic.twitter.com/viCy7qW06m
— ANI (@ANI) March 11, 2022
काय आहे प्रकरण?
‘ईडी’ने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केली. दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी नवाब मलिक यांचा संबंध असल्याचं ईडीला तपासात आढळलंय. त्यानुसार ईडीने कारवाई करत नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी अटक केली. मात्र ईडीनं केलेली आपली अटक ही बेकायदेशीर असल्याचा दावा करत ईडीनं नोंदवलेला गुन्हा आणि पीएममएलए न्यायालयाच्या आदशेला हायकोर्टात आव्हान दिलं आहे. आपली तात्काळ सुटका करण्यात यावी, अशी मागणी करणारी फौजदारी याचिका नवाब मलिक यांनी दाखल केली आहे. आपल्या विरोधात निव्वळ राजकीय सूड उगविण्यासाठीच केंद्रीय तपासयंत्रणांचा वापर होत असल्याचंही मलिक यांनी या याचिकेत म्हटलेलं आहे. मलिकांच्या रिमांडसह यावरही येत्या सोमवारी हायकोर्टात सुनावणी होणार आहे.