…तोपर्यंत सरकारला कोणताही धोका नाही- जयंत पाटील

मुंबई : देशातील पाच राज्याच्या निवडणुकांचा निकाल लागला आणि पाच पैकी चार राज्यात भाजपने दणदणीत विजय मिळावता आला आहे. मात्र तीन राज्यात राष्ट्रवादी काॅँग्रेस अपयशी ठरला आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  यांनी निवडणुकीचा निकालावर भाष्य केले आहे. उत्तर प्रदेशमध्ये जर सर्व विरोधकांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली असती, तर आजचे हे चित्र कदाचित दिसले नसते, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपच्या हातातूनही काही राज्य गेली आहेत. त्यामुळे एखादं मोठं राज्य जिंकलं म्हणून महाराष्ट्रातलं सरकार पडेल, हे काही शक्य नाही. महाराष्ट्राची मानसिकता वेगळी आहे. सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस आघाडी जोपर्यंत भक्कम आहे तोपर्यंत या सरकारला कोणताही धोका नाही. तसेच मुंबई महापालिका शिवसेनेच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्यारीतीने काम करत आहे. त्यामुळे भाजपकडून फक्त वातावरण निर्मिती करण्याचा प्रकार होत आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

सध्या केंद्रीय तपास यंत्रणाकडून सुरू असलेल्या धाड सत्रावर ते म्हणाले की, भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करायला कोणाचाही विरोध नाही परंतु असे भ्रष्टाचारी फक्त भाजप सोडून इतर पक्षातच आहेत का? त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांनी जरा त्यांच्याकडेही लक्ष द्यावं, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

Share