देवेंद्र फडणवीस १०-२० पवार खिशात घालून फिरतात – पडळकर

मुंबई- गोवा विधानसभा निवडणूकीत देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या कामगिरीचे सर्वांकडून कौतूक केले जात आहे. आज फडणवीसांचा मुंबई येथे भाजपाने शक्ती प्रदर्शन करत जंगी सत्कार केला.  गोव्यात दुसऱ्यांदा भाजपला सत्ता मिळाली आहे. या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांच्या सत्कार समारंभा नंतर पडळकर बोलत होते.

शरद पवारांना फडणवीसांचं यश अद्याप मान्य झालेल नाही असं विचारण्यात असता गोपीचंद पडळकर म्हणाले की, शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत पण श्रेष्ठ नाहीत. काही जरी केलं तरी मीच केलं, कोणी माझ्या पुढे जाऊ नये अशी त्यांची भूमिका आहे. पण देवेंद्र फडणवीस असे १०-२० पवार खिशात घालून फिरतात. त्यांच्यापेक्षा कितीतरी प्रगल्भ नेतृत्व फडणवीसांचं आहे”. असं पडळकर यावेळी म्हणाले आहेत.

फक्त विश्वासघातकीपणा, गद्दारीपणा, लबाडीपणा, राष्ट्राच्या विरोधात भूमिका जी शरद पवारांकडे आहे तसले विषय सोडून त्यांच्या पुढचं नेतृत्व करण्याची ताकद देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आहे, असंही त्यांनी विश्वास या वेळी व्यक्त केला .

Share