प्रिय बाबा, तुम्ही आम्हा सर्वांसाठी उर्जेचा अखंड स्रोत आहात

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांंचा आज ८२ वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांची कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या वडिलांबद्दलच्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

सुप्रिया सुळे आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, प्रिय बाबा, तुम्ही आम्हा सर्वांसाठी उर्जेचा अखंड स्रोत आहात. समाजकारण, राजकारण या क्षेत्रांसह कौटुंबिक पातळीवर देखील तुम्ही आम्हा सर्वांचे आदर्श आहात, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. “तुमच्या विचारांची स्वाभिमानी मशाल घेऊन आम्ही सर्वजण आपल्यासोबत अविश्रांत चालण्याचा प्रयत्न करीत आहोत. बाबा, तुम्हाला निरोगी दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, असं या पोस्टमध्ये सुप्रिया यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहेत. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही शरद पवार यांना ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत. तर काॅंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी फोन करून शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Share