९३ सालच्या निवडणूकीत सेनेच्या १७९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त !

मुंबई-दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील शिवसैनिकांशी रविवारी दूरदृष्य प्रणालीव्दारे संवाद साधला.  या संवादात उद्वव ठाकरे यांनी भाजवर टिका केली आहे. त्यांच्या या टिकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिउत्तर दिल आहे. मुंबई आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

फडणवीस बोलताना म्हणाले की, बाबरी मशीदीनंतर संपूर्ण देशात शिवसेने करता अतिशय अनूकूल लाट होती. आणि तेव्हाचं जर शिवसेनेने सीमोलंघन केलं असतं,तर आज दिल्लीत सेनेचा झेंडा असता. १९९३ च्या उत्तरप्रदेशाच्या निवडणूकीमध्ये सेनेने १८० उमेदवार लढवले होते. लाट असताना देखील या उमेदवारांपैकी १७९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करण्यात आलं होत. यात एकाचं डिपॉझिट वाचलं होतं असा हल्लबोल फडणवीस यांनी केला.

पुढे ते म्हणाले की, १९९६ मध्ये २४ उमेदवार लढवले होते. त्यातील २३ लोकांच डिपॉझिट जप्त झालं होतं.  २००२ मध्ये ३९ उमेदवार लढवले आणि सगळ्या उमेदवारांच डिपॉझिट जप्त झालं. त्यामुळे हि शिवसेनेची लाट वगैरे जी होती , आणि आम्ही भाजपला साथ दिली परंतू असं काही झालं नाही. तुम्ही जागा लढवल्या परंतू लोकांनी तुम्हाला नाकारलं. ९३ साली देखील नाकारण्यात आलं कारण आणि राम जन्म भूमीच्या आंदोलनात कोण सक्रीय होतं हे लोकांना माहित होतं. तार सेवक आणि संघ विचाराचे लोक या आंदोलनात जास्त प्रमाणात सक्रीय होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सिलेक्टीव्ह मेमरीने बोलणं बंद केलं पाहिजे. आणि राज्यावर त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. असं मत पत्रकार परिषदेत भापजचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल आहे.

Share