वर्ध्यातील सात अपघाती मृत्यूमुखींना मोदींकडून मदत जाहीर

वर्धाः शहरामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली. देवळी मार्गावर रात्री दीडच्या सुमारास काल चारचाकी गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातात सात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये भाजपच्या आमदार पुत्राचाही समावेश आहे.

वर्ध्यामधील सेलसुरामधे एक्सयुव्ही कारचा भीषण अपघात झाला आहे. अचानक चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटल आणि गाडी सेलसुरा येथील नदीच्या पुलावरून खाली कोसळली. अपघात इतका भीषण होता की गाडीतील सर्व साहित्याचा चेंदामेंदा झाला आहे. विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक चालकास या बाबत माहिती मिळाली. त्याने वर्धेकडे सलोडला येताना सावंगी पोलिसांना यासंदर्भातील माहिती दिली. या अपघातात दत्ता मेघे वैद्यकीय रूग्णालयातील सात विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार विजय राहांगडाले यांचा एकुलता एक मुलगा अविष्कार रहांगडाले यांचाही समावेश आहे.

कसा झाला होता हा अपघात?
वर्धा देवळी मार्गावर मध्यरात्री दीड वाजता हा भीषण अपघात घडला. या मार्गावरील सेलसुरा इथल्या दुभाजकाला धडकून झायलो गाडी पुलावरून खाली कोसळली. त्यात गाडीतल्या सर्वांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की गाडीतल्या सर्व साहित्याचा चेंदामेंदा झाला आहे. विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक चालकास अपघात झाल्याचं लक्षात आलं. त्याने याबद्दल सावंगी पोलिसांना माहिती दिली.

 

अपघात ग्रस्तांना मदत जाहीर
वर्धा देवळी मार्गावरील सेलसुरा इथं काल रात्री दीडच्या सुमारास झालेल्या अपघातात सात तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या नातेवाईकांना तसेच जखमींना मदत जाहीर केली आहे. याबाबद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडून ट्वीट करत मदतीची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून सेलसुराजवळ झालेल्या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

Share