भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना कोरोनाची लागण

नागपुर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापाठोपाठ राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावकुळे यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: बावकुळे यांनी याबाबतची माहिती ट्विट करुन दिली आहे.

‘माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला घरीच आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक औषधोपचार व काळजी घेत आहे. अलीकडे माझ्या संपर्कात आलेल्या सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी आपली चाचणी करून घ्यावी ही विनंती असं ट्वीट करत बावनकुळे यांनी कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती देत संपर्कातील लोकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. शरद पवारांनी स्वतः ट्विट करत कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. कोरोनाचा राज्यात वेगाना प्रसार होत असल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शरद पवार गेले काही दिवस नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाली असल्यामुळे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. पवारांनी कोरोनावर मात केल्यानंतर सर्व नियोजित कार्यक्रम पार पाडण्यात येतील असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

Share