मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. अजित पवार यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. रविवारी कोरोनाची चाचणी केली होती. त्याचा पाॅझिटिव्ह आला आहे. असे अजित पवार यांनी सांगितलं.
अजित पवार यांनी ट्वीट मध्ये म्हटलं की, काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.
काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 27, 2022
दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. कोरोनातून बरं होऊन राज्यपाल नुकतेच परतले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. एकनाथ शिंदे गटातील मंत्री सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या खात्याची फेररचना केली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना अतिरिक्त कार्यभार दिला आहे. या सर्व घडामोडीमध्ये अजित पवार कोरोनामुळे क्वारंटाईन झाल्यानं त्याचा परिणाम राज्य सरकारच्या कामगिरीवर होणार आहे.