उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज ठाकरेंनी पत्र लिहून कौतुक केलं होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. आज देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली.

दरम्यान, गेल्या महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर हिपबोन शस्त्रक्रिया झाली होती. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही सदिच्छा भेट असल्याचं भाजपाच्या गोटातून सांगितलं जात आहे. मात्र. सध्या राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणि मुंबई महानगर पालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकांमुळे या भेटीमध्ये बदलत्या राजकीय समीकरणांवर देखील चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.

Share